Monday, February 18, 2008

ती - एक दिव्य

ती - एक दिव्य

कधीतरी मला सावल्यांना रंग देऊन पहायचाय

सुर्यावर पाणी टाकुन त्याचा दाह शमवायचाय

पांढरा रंग चंद्राला फासुन त्याला बेदाग करायचय

हर एक चांदणीला खाली खेचुन आकाशाला रीतं करायचय

समुद्राला आटवुन शंख शिंपल्यांना वेचायचय

अखंड चालत राहून क्षीतिजापार पोचायचय

उडत जाऊन आकाशात ध्रूवाला जाऊन भेटायचय

अढळ स्थानाजवळ जाऊन त्याच्या जरास खेटायचय

हितगुज करुन त्याच्याशी एकच रहस्य वदवायचय

एकट राहता राहता विरहाच दुःख कस रे पचवायच?

गाढ झोपी जाऊन ती माझी असलेल स्वप्न पहायचय

जाग झाल्यावर त्याच स्वप्नाच्याच दुनियेत ऊठायचय

असच कधीतरी तिचा हातात हात घेऊन नुसतच बसायचय

रडता रडता तिच्या सांत्वनाने एकदातरी हसायचय

या दीव्यांच्या पंक्तीत आता ही कुठुन आली असा प्रश्न पडलाय ना?

काय मी तरी करु ती माझ्यासाठी दीव्य होण्यामागे तिचा नकार दडलाय ना

म्हणुन मला या विश्वातुन राहू केतुंना हकलायचय

मंगळामागे शनीला लावुन आता माझ नशीबच बदलायचय

- विकी