Wednesday, March 19, 2008

प्रेमाच नाव देऊ नकोस

प्रेमाच नाव देऊ नकोस

समाजाच्या भितीपायी प्रेमात मझ्या पडू नकोस
येईल माझी आठवण तर मात्र रडू नकोस

असुन मैत्रीणीँच्या गराड्यात एकटी मात्र राहू नकोस
असतील वाटेवर डोळे पण वाट माझी पाहू नकोस

पडेल माझे स्वप्न म्हणुन रात्री तु झोपु नकोस
निघताच माझे नाव डोळ्यातले भाव मात्र लपवु नकोस

शेवटी रहा अशीच एकटी अन् सुख मलाही देऊ नकोस
पुढे होशील कधीतरी कोणाची त्याला प्रेमाच नाव देऊ नकोस !!

विरही रात्र

विरही रात्र

मावळला सुर्य न संधीप्रकाश जीवनी उरला !
बोचऱ्‍या आठवणीँचा सुगंध आसमंती दरवळला !!
लाल क्षितिजावरती पक्षांची दीसे आडवी रांग !
मन पोहचते शुन्यात अन विचारांत अथांग !!
अंधाराचा विळखा जगाबरोबरच माझ्या मनाला !
ह्रदयाचे हुंदके मग वाढती क्षणाक्षणाला !!
चंद्राच हळुच डोकावण रात्रीला जरी करते शांत !
पण माझ मन पुरत बुडत आठवणीत नखशिखांत !!
चांदण्यांनाही माझी दशा मग बघवत नाही !
माझ्या इच्छेसाठी पडल्याशिवाय त्यांनाही राहवत नाही !!
रात्र अशीच माझ्यासह पहाटेकडे झुकते !
माझा विरह पाहुन पहाटेलाही मग रडु फुटते !!
उभी रात्र अन पहाटही माझ्यासह अश्रुंनी थिजते !
उगाच का मग अवघी धरा दवाने भिजते !!
अखेर या सर्वाँची सुर्याला मग दया येते !
उगवत्या सुर्याचे किरण दवाश्रुंचा पसारा पुसते !!
असाच रोज असतो मी रात्री हतबल !
असतो सदा दुःखी अन असते मनी चलबिचल !!

चेहरा तिचा पहायला

चेहरा तिचा पहायला

स्वप्नालाही स्वप्न पडावे
रात्रीने दीवसासाठी रडावे
चेहरा तिचा पहायला

चेहरा तिचा पहायला

चंद्रालाही मोह पडावा
सुर्याचाही जीव जळावा
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

आरसा लाजवी चातकाला
असतो इतका तहानलेला
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

ह्रदयाचा ठोकाही चुकतो
घड्याळाचा काटा थांबतो
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

हर वक्त असतो तिचाच नुर
दिवस रात्र असतो आतुर
चेहरा तिचा पहायला
चेहरा तिचा पहायला

Monday, February 18, 2008

ती - एक दिव्य

ती - एक दिव्य

कधीतरी मला सावल्यांना रंग देऊन पहायचाय

सुर्यावर पाणी टाकुन त्याचा दाह शमवायचाय

पांढरा रंग चंद्राला फासुन त्याला बेदाग करायचय

हर एक चांदणीला खाली खेचुन आकाशाला रीतं करायचय

समुद्राला आटवुन शंख शिंपल्यांना वेचायचय

अखंड चालत राहून क्षीतिजापार पोचायचय

उडत जाऊन आकाशात ध्रूवाला जाऊन भेटायचय

अढळ स्थानाजवळ जाऊन त्याच्या जरास खेटायचय

हितगुज करुन त्याच्याशी एकच रहस्य वदवायचय

एकट राहता राहता विरहाच दुःख कस रे पचवायच?

गाढ झोपी जाऊन ती माझी असलेल स्वप्न पहायचय

जाग झाल्यावर त्याच स्वप्नाच्याच दुनियेत ऊठायचय

असच कधीतरी तिचा हातात हात घेऊन नुसतच बसायचय

रडता रडता तिच्या सांत्वनाने एकदातरी हसायचय

या दीव्यांच्या पंक्तीत आता ही कुठुन आली असा प्रश्न पडलाय ना?

काय मी तरी करु ती माझ्यासाठी दीव्य होण्यामागे तिचा नकार दडलाय ना

म्हणुन मला या विश्वातुन राहू केतुंना हकलायचय

मंगळामागे शनीला लावुन आता माझ नशीबच बदलायचय

- विकी

Monday, January 21, 2008

प्रश्न - तिचे की माझे

प्रश्न - तिचे की माझे

जीवनात माझ्या रंग होतेच कधी मग
बेरंग चित्रातले रंग उडविलेसच कसे तु?
प्रश्न विचारलाच नव्हता तुला कधी मग
'तुझी नाहीच मी' अस उत्तर दिलेसच कसे तु?
दिवसा चैन अन् रात्री झोप दिली नाहीस कधी मग
तु ज्यात असुनही माझी नसणारे स्वप्न दिलेसच कसे तु?
सुरूवात तुझ्यापासुन केलीच नव्हती कधी मग
प्रत्येक विचार तुझ्यापर्यँत येऊन थांबावा असे केलेसेच कसे तु?
एक शब्दसुद्था नीट रचता येत नव्हता कधी मग
कविता लिहीण्याजोग मन कल्पक बनविलेस कसे तु?
प्रश्न हे इथेच संपत नाहीत उलट वाढतच जातील
उत्तरे तुला देताच येणार नाहीत उलट तुझेच प्रश्न बनुन राहतील...
--विकी

Thursday, October 11, 2007

आज मी एक स्वप्न पाहिले
बघता बघता तुतुनी
गेले

निदान रात्र तरी माझी असावी
ती नसलीतरी तिची चाहुलतरी असावी


more coming soon........