विरही रात्र
मावळला सुर्य न संधीप्रकाश जीवनी उरला !
बोचऱ्या आठवणीँचा सुगंध आसमंती दरवळला !!
लाल क्षितिजावरती पक्षांची दीसे आडवी रांग !
मन पोहचते शुन्यात अन विचारांत अथांग !!
अंधाराचा विळखा जगाबरोबरच माझ्या मनाला !
ह्रदयाचे हुंदके मग वाढती क्षणाक्षणाला !!
चंद्राच हळुच डोकावण रात्रीला जरी करते शांत !
पण माझ मन पुरत बुडत आठवणीत नखशिखांत !!
चांदण्यांनाही माझी दशा मग बघवत नाही !
माझ्या इच्छेसाठी पडल्याशिवाय त्यांनाही राहवत नाही !!
रात्र अशीच माझ्यासह पहाटेकडे झुकते !
माझा विरह पाहुन पहाटेलाही मग रडु फुटते !!
उभी रात्र अन पहाटही माझ्यासह अश्रुंनी थिजते !
उगाच का मग अवघी धरा दवाने भिजते !!
अखेर या सर्वाँची सुर्याला मग दया येते !
उगवत्या सुर्याचे किरण दवाश्रुंचा पसारा पुसते !!
असाच रोज असतो मी रात्री हतबल !
असतो सदा दुःखी अन असते मनी चलबिचल !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Very good.........
Post a Comment